Breaking News
Loading...
Tuesday, 10 November 2009

चारोळ्या

♡♥♡♥♡

प्रेमाच्या वाटेवर तीचे पाऊल
कधी वळलेच नाही
कितीही यत्न केले तरीही
माझे मन तीला कळलेच नाही.

♡♥♡♥♡

माझे आसू पुसून तिनं
आमच्या सुखात हसावं
कधीतरी वाटतं यार,
आपलंही कुणीतरी असावं!

♡♥♡♥♡

नसशील तू चाफेकळी,
वा न कोमेजणारी बकुळी
तरीही मला आवडतेस,
आहेस तशीच वेडीखुळी.

♡♥♡♥♡

स्पष्टीकरण करणं सोपं आहे
थोडक्यात सांगणं कठीण आहे
चार शब्दांत सांगायचं तर
माझं तुझ्यावर प्रेम आहे.

♡♥♡♥♡

गुलाबचे फुल तुला देताना,
त्याचे काटे
माझ्या हातात रुतले,
डोळे मात्र तुझे पाणावले..

♡♥♡♥♡

वाटतं आपण एकदा
पुन्हा अनोळखी व्हावं,
ओळख करायला तुझ्याशी
पुन्हा धडपडावं.

♡♥♡♥♡

खट्याळ वार केव्हा पासुन
तुझ्या केसांशी खेळत होता
माझं मन मात्र
उगाचच जाळत होता.

♡♥♡♥♡

मन कुणाचं जाणताना
भाषेची गरज भासते,
तुझं मन तुझ्या डोळ्यात दिसतं
तिथे भाषेची गरज नसते.

♡♥♡♥♡

ओठापर्यंत आलेले शब्द
मी मोठ्या कष्टांनी मागे वळवले
पण डोळेच असे चुकार की
बोलायचं ते बोलून गेले.

♡♥♡♥♡

माझ्या भिजलेल्या-तहानलेल्या पापण्यांना
तुझ्याच भावनांचा आधार आहे,
तुझ्या चेह-यावरच्या ओठपाकळीला
माझ्याच ओठांचा पुकार आहे.

♡♥♡♥♡

तुला खुप काही सांगायचं असतं
पण तू कधी बोलतच नाहिस
आता डोळ्यांनी तरी सांगू किती
माझ्या भावना तू समजुनच घेत नाहिस

♡♥♡♥♡

आज पावसाने सकाळी दिली मनाला उभारी,
पण तुझी आठवण आल्या शिवाय राहिली नाही.
कोणीही किती ही समजावले तरी,
तुला विसरणे ह्या जन्मात तरी शक्य नाही.

♡♥♡♥♡

पाणावलेल्या कडा म्हणतात
विसरु नकोस मला,
ओठांवरच स्मित म्हणतं
आठवेलच मी तुला.

♡♥♡♥♡

तूला एकदा बघण्यासाठी
गच्चीवर तासन तास घुट्मळणे,
तू बघायचीस पडद्याआडून
तूला आवडायचे मला छळणे…

♡♥♡♥♡

तुझ्याशी बोलातना फार फार आनंद होतो,
मनातल्या मनात मी नाचत असतो,
वर वर दाखवत नसलो तरी,
माझ्या मनातले भाव तुझ्या मनात शोधत असतो.

♡♥♡♥♡

माझ्या आनंदाच नातं
तुझ्या हास्याशी आहे,
माझ्या दुःखाच नातं
तुझ्या अश्रूंशी आहे.

♡♥♡♥♡

एकदा प्रेमाने विचारले विश्वासास,
आपल्यातील नाते काय?
विश्वास उत्तरले..मीच तुझे प्रेम
आणि तुच माझा विश्वास !!

♡♥♡♥♡

तुझ्या प्रेमाची चाहुल लागताच
झाडे वेली हलू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द शब्द जुळू लागतात.

♡♥♡♥♡

तुझ्या मोहक हसण्यामध्ये
माझे 'मीपण' हरवून बसलो
मला ना माहित, कधी न कळले
कसा, कुठे अन केव्हा फसलो.

♡♥♡♥♡

सगळ्या गोष्टी कशा
भराभर घडत गेल्या
मी प्रेमात पडलोय म्हणेपर्यंत
एकाकी कातरवेळा उठवायला आल्या.

♡♥♡♥♡

--
With Lots Of Love
Sachin Haldankar.

♡♥♡♥♡

0 comments:

Post a Comment