Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरासू नकोस

तू बरासलस तर
ती अडकून बसेल
तू थांबावा म्हणून माझे
पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल

काही क्षण तुझ्या थांबण्याची ..
मग ती…ती वाट पाहील
निघेल मग पावसात ती
सावरत सावरत ती माझ्या कडे येईल

ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित
ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत
म्हणेल "माफ कर.मला उशीर झाला
मी निघालेच होते पण पाऊस आला"
मी माझा जॅकेट तिला देईल,
ती म्हणेल नको रे मी ठीक आहे.
हळूच मी तिचा हात हातात घेईल,
मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे
तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ?
तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी
पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित,
घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल.
माझे जॅकेट मला परत करून.
निशब्द होऊन निघून जाईल ती
निशब्द मला करून तोडून जाईल ती

""तू थांबू नको रे
पावसा तू बरसतच रहा
ती नाही आली तरी चालेल मला
तिच्या नकारा पेक्षा …
ती तुझ्या मूळे नाही आली
असे खोट खोट..
मनाला समजावन आवडेल मला….""

तू थांबू नको रे
तू बरसतच रहा ..........

0 comments:

Post a Comment