Breaking News
Loading...
Saturday, 14 November 2009

नाक्यावरच्या पिंटूच एकदा,
सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल,
लव लेटर लिहून दे ,
मित्रांनी पिंटूला फूल उचकवल.

पिंटून लिहिल लव लेटर,
रात्र रात्र जागुन जागुन ,
चंद्र चांदण्या डार्लिंग जानू ,
भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन.

गाडीवरती ट्रिपल सीट बसून,
रात्रि पिंटू सोसायटीत आला ,
घाबरू नको पिंटू म्हणुन ,
मित्रांनी त्याला धीर दिला .

दगडाला लपेटून लेटर ,
पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल,
खिड़की फुटायचा आवाज आला ,
लेटर तसच हातात राहील.

कोण आहे रे तिकडे म्हणुन ,
पिंकिच्या आईने दार उघडले ,
पिंटूला तिथच सोडून देऊन ,
मित्र त्याचाच गाडीवरून पळाले.

चोर चोर चोर ओरडत ,
पिंकिच्या आईने केला कल्ला ,
पळता पळता पायाला पिंटूच्या,
गल्लीचा कुत्रा कचकन चावला .

पिंकिचा होकार तर दुरच ,
पण १४ इंजेक्शन घ्यावे लागले,
पिंटूचे हे प्रेम प्रकरण,
चांगलेच त्याच्या अंगावर आले .

0 comments:

Post a Comment