Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

असे हे प्रश्न फक्त मलाच..... की तुम्हाला सुधा पडता
जुन्या औल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात
आता मोठे जाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंड रोज रोज भेटतात ???

कधीतरी मार्चमधे चीनुच्या Birthaday ला भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नवम्बर मधे
मीनूच्या Birthaday पर्येंत काढले जायचे.................

हल्ली मात्र रोज फोटो काढतो..
पण तरीही बाबानी पुरुवुन पुरुवुन
वापरलेल्या रोल मधले फोटो जास्ती का प्रीय वाटतात ???

त्या वेळी बाबानी माहिन्यातुन एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वत:च्या पैशनी रोज खाल्ले तरी बेचव का वाटतात??

पकिटातल्या ५०० रुपयापेशा आईकडून मागुनघेतलेले २० रूपये नेहमी जास्त का वत्ताता ???
बाबाच्या खिशात हलूच सरकवलेले २००० रूपये जेव्हा त्याना अचानक सापडतात..
तेव्हा त्याच्या चेहर्यावर आनद पाहून अश्रु डोळ्यात दाटतात....

१० -१५ वर्षा पूर्वी ज्या बहीणीशी खुप जुन वैर असल्यासारखे भाडायचो...
आज त्याच बहीणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात???
ते जुने दिवस आठवले की, का मनात खोल घर करून जताता...

असे हे प्रश्न फक्त मलाच..... की तुम्हाला सुधा पडताता

0 comments:

Post a Comment