Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009


हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !

बघ निळ्सर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे ग पिवळे केशर मळे
ही किमया घडते केवळ प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुगुट घालिती शिरी

रुसलास उगा का जवळी येना जरा
गा गीत बुलबुला माझ्या प्रितपाखरा
हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर, किती करु शायरी

हर रंग दाविती, गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजरीगीत - ग. दि. माडगूळकर
चित्रपट - मधुचंद्र

0 comments:

Post a Comment