Breaking News
Loading...
Friday, 15 January 2010मनातील तुझ्या विचारांना
आवर कसा रे घालु,
तूच सांग अजून किती दिवस
तुला नुसतंच स्वप्नात पाहू.

भेटशील कधीतरी याच आशेवर
अजूनही मी रे जगतेय,
नजर का गर्दीत दरवेळी
तुलाच जिथेतिथे शोधतेय.

ये ना आतातरी समोर
का इतकं सतावतोस,
जाणून बुजूनच ना रे
तू हे सर्व काही करतोस.

म्हणूनच ठरवलंय मी हि
आता माझ्याच मनाशी,
समोर येत नाहीस तोपर्यंत
जा कट्टीच तुझ्याशी.

- संतोषी साळस्कर.0 comments:

Post a Comment