Breaking News
Loading...
Thursday, 21 January 2010

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...

प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण...
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...

प्रेम म्हणजे बंधन, प्रेम म्हणजे पाश...
पैशांचा होतो खुर्दा, अन वेळेचाही नाश...

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस

0 comments:

Post a Comment