Breaking News
Loading...
Thursday, 29 July 2010

चमत्कार माझ्या जीवनात
आज असा काही झाला..
हृदयाची ती बाजू ऐकायला
एक व्यक्ती अचानक आला..

दैवी चमत्कार हा असाही असतो
शोधात असतो आपण कोणाला..
तो आपल्या जीवनात पाठवतो
दूत बनुनी एक व्यक्तीला..एक-दोन आठवड्यांची ओळख
इथवर जाऊन पोहचली..
वाटले जणू मनाला असे
कित्येक वर्षे आम्ही एकत्र काढली..

वाटते मनाला आज असे..
सोबत तिच्या सदा रहावे..
आयुष्यातील सुंदर क्षण ते
तिच्यासोबतच घालवावे..


प्रेमाच्या त्या वाटेवरती
आज मी उभा राहिलो..
आयुष्याची साथ मिळण्यासाठी
प्रेमाचे घर ते बांधुनी आलो..


माझ्या चेहऱ्यावरचे हास्य
आज तू बनशील का..?
स्वप्नात येउनी माझ्या तू..
माझे गोड स्वप्न बनशील का..?


आयुष्याची साथ मिळायची
संधी आज मी मिळवतोय..
विचारला प्रेमाचा तो प्रश्न..
तुझ्या उत्तराची वाट मी पाहतोय...उत्तराची वाट मी पाहतोय... 


0 comments:

Post a Comment