Breaking News
Loading...
Saturday, 31 July 2010

एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते.
तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,
"ए, आती क्या खंडाला?"
... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"


-
एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!

-
पप्याचे बाबा FTV बघत असतात..
अचानक पप्या येतो
तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...
"अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... "
तर पप्या म्हणतो...
"यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."


-
जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता... कारण बायकोने विचारले असते...
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
...इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मित्र बरोबर असतीलच ना?
दारू रोज ढोसणार का?
मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात...-
मन्या बाबांना म्हणाला, ''बाबा बाबा, मला सर्कस दाखवा ना!''
बाबा म्हणाले, ''मला श्वास घ्यायला फुरसत नाहीये रे मन्या!''
''
... असं हो काय करता बाबा? मी ऐकलंय त्या सर्कशीत एक तरुण मुलगी अंगावर एकही
कपडा न घालता एका चित्त्याच्या पिंजऱ्यात शिरते आणि चित्त्याला जेवण
भरवते!''
'' काय सांगतोस?'' बाबा टुणकन् उडालेच, ''अरे मग आज संध्याकाळीच जाऊ
सर्कस बघायला. मी बरेच दिवसांत चित्ता नाही बघितलेला!!!!''-
गुरुजी : मुलांनो, सांगा पाहू महाभारतात पांडुला ५ आणि ध्रुतराष्ट्राला
१०० मुले. असे का?
१ टार्गट मुलगा : गुरुजी, डोळस माणसाला इतरही बरीच काम असतात.


-
दादा कोंडकेंना १ मुलगा त्यांची चड्डी पाहुन विचारतो
मुलगा : दादा तुम्ही चड्डी कुट शिवता?
दादा : कुट म्हन्जे, फ़ाटल तीथ.


-
एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
मुलगा म्हणतो " T.Y.B.Com., आणि तू ..? "


-
राजू- Dr. तुम्ही म्हणाले होतात की, सकाळी खेळल्यानेतब्येत ठीक राहते...
पण मला काही फ़रक नाही पडला...
Dr - राजू तू कोणता खेळ खेळतोस ???
राजू- Mobile मधला SNAKE......

-
टेलिफोनची रिंग वाजते
नवरा (घरी असतो बायकोला बोलतो) : माझ्यासाठी असेल तर सांग मी घरी नाहीये
बायको (फोनवर) : नको नको ... ते घरीच आहेत


-
एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात.
बंडू तु सांग "मी तुला १० गोळ्या दिल्या"
त्यातल्या ३ तू रोहिणीला दिल्यास ,३ विजयाला दिल्यास
...अणि ४ स्मिताला दिल्यास तरतुला काय मिळेल??
बंडू:- सर मला ३मैत्रिणी मिळतील..

-
एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्यां मगाला काय म्हणेल ???
......विचार करा
...........अरे विचार काय करताय?
....सोप्पय उत्तर : काय "मग" काय चाल्लय?

-
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात
....रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार..."
तर त्या मांजरी काय म्हणतील ??
...विचार करा
...अरे विचार काय करताय?
.. सोप्पय उत्तर: " माऊ माऊ"!!

-
कोंबडा अणि कोंबडी जोक ....
कोंबडा-i love u.
कोंबडी-अय्या खरच..मग तू माझ्यासाठी काय करू शकतो ???
कोंबडा-काहीही ..........
कोंबडी-चल मग एक अंड दे बर पटकन .......


-
ह्या जगात ह्या गरिबाला नाही उरला वाली,
ह्या जगात ह्या गरिबाला नाही उरला वाली,
अप्सरा आली
...इंद्रपुरीतून खाली,
आणि म्हणाली.......,
आपका क्या होगा
जनाबे अली?
आपका क्या होगा?


-
सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...
.
तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?"
.
...
पप्या काहीच बोलत नाही..
.
त्याचे वडील परत विचारतात .."
अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? ".
.
पप्या म्हणतो,
" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"
.
पप्याचे बाबा बेशुद्ध !!---


-
छोटा पप्प्या at his INNOCENT level---
पप्याचे बाबा कामानिमित्त वर्षभर परदेशात गेलेले असतात....
तर एक दिवशी अचानक पप्या आईकडे हट्ट करायला लागतो..,
...
" मला अजून एक छोटा भाऊ पाहिजे ..लवकरात लवकर "..
आईला काय बोलावं सुचत नाही....त्याची आई म्हणते," तुझे बाबा आले कि आपण बोलू "
पप्या लगेच म्हणतो...." नको नको बाबांना नको बोलूस.. आपण ते आले कि
त्यांना मस्त SURPRISE देऊ यात ना !!"


-
झम्प्याची लाडावलेली गर्लफ्रेंड .....
एकदम धावत पळत त्याच्याकडे येते आणि म्हणते..
" झम्पू...मी माझी पर्स घरी विसरलेय आणि मला आता लगेच एक हजार रुपये लागतात..
...
please मला एक हजार रुपये दे ना लगेच...."
झंप्या मस्तपणे पाकीट काढतो ...आणि
तिच्या हातात ५० रुपये ठेवून म्हणतो ..
" जा .....रिक्षाने घरी जाऊन पर्स घेऊन ये "

-
बायको-काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत.खरे आहे का हे?
नवरा-हो खरे आहे.
बायको- पण का हो असे?
...
नवरा-अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.


-
सर्कशीच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात
जाउन किस करते. सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघतात. पिंजऱ्याभोवती
गोल चक्कर मारीत रिंग मास्टर प्रेक्षकांनाविचारतो, '' तूम्ही हा नजारा
कधी बघितला नसेल ... आणि बघणारही नाही...प्रेक्षकातले कुणी असं करु
शकते?''
प्रेक्षकातूनएक माणूस उभा राहतो आणि ओरडून ...म्हणतो,
'' हो... मी करु शकतो... पण आधी त्या सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''


-
पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त ५ STAR
हॉटेलात जेवून आलो..
दुसरा भिकारी : ह्या १०० रुपयात जेवण शक्यच नाही..
पहिला भिकारी : मी मस्त आत गेलो..भरपेट जेवलो...न बिल झाले ५०००..तर
त्यांनी पोलिसांना बोलावले..
दुसरा भिकारी: च्यायला मग काय झाले ?
पहिला भिकारी : काही नाही हॉटेल बाहेर येताच मी पोलिसांना १०० रुपये दिले
आणि म्हटलं..घ्या प्रकरण मिटवून..


-
लाईट बिल खूप जास्त आल्यामुळे चिडून आई पिटूला ओरडत असते ....
आई: काय रे, एवढं बिल कसं काय आलं? सारखे का लाईट चालू ठेवतोस???
पिटू: यूँ तो मैं बतलाता नहीं.....पर अँधेरे से डरता हूँ मैं माँ !!!!
तुझेसब है पता है ना माँ ?


-
संत्या रिक्षावाल्याला म्हणाला, "सदाशिव पेठेत येतोस का?"
रिक्षावाला म्हणाला, "चाळीस रुपये होतील."
संत्या म्हणाला, "दहा रुपये देतो." ...
...रिक्षावाला म्हणाला, "दहा रुपयात कोण नेईल?"
संत्या म्हणाला, "मागे बस. मी नेतो!!


-
जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन
द्यायचं, काय?.
बंड्या : हो सर.
जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!

-
झंप्या आपल्या होणार्‍या बायकोला घेऊन पहिल्यांदाच बागेत गेला होता.
आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने तिला विचारले,"मी तुझे चुंबन घेऊ शकतो का?
"नाही",ती म्हणाली.
...
"का गं ?"झंप्या म्हणाला.
ती-"आईने सांगितलेय की त्याने काही विचारले की ' नाही ' हेच उत्तर द्यायचे.
झंप्या-[विचार करून]ठीक आहे.मग मला सांग,मी तुझे चुंबन घेतले तर तुझी
हरकत तर नाही ना ?
ती- नाही-
पहिला मित्र: ४ दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...
....
रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
... दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..
पहिला मित्र: hmm ... येताना टाकली तर चालेल का?

-
एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो...झंप्या: देवा, मला फार काही
नको, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलींनी भरलेली मोठी गाडी
हवी आहे...
देव: तथास्तु!!!!
आज झम्पेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत!!!

-
निरागस ? ? ?
आई-[सोनूला]अरे बाळा ती बघ मावशी चालली.तिला पापा दे बघू एक छानसा !
सोनू-नको.मीनाय.ती मालेल मला.
आई-असे का म्हणतोस रे?
सोनू-काल तू बायेल गेलेलीशना, तेवा बाबांनी तिचा पापा गेतला
आनि मग तिने बाबाना माल्ले.मला पन माल्ल तल?
-

0 comments:

Post a Comment