Breaking News
Loading...
Saturday, 14 August 2010

 १५ ऑगस्ट ना मित्रा.
आनंदाने भरून आलाय ऊर.
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर..


 १५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस.
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!


 १५ ऑगस्ट ना मित्रा,
सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !

पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
"कौन बनेगा करोडपती" संपून
झालेत बरेच दिवस !


 १५ ऑगस्ट ना ,
मग आश्वासनं आणि स्वप्नं विका.
ठाऊक आहे उद्याच पडणार
त्यांचा रंग फ़िका..!


१५ ऑगस्ट ना ,
मग म्हण "विविधतेत एकता".
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!


 १५ ऑगस्ट ना ,
"मेरा भारत महान" जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी,
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.


 १५ ऑगस्ट ना ,
चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .

काळजी करू नकोस,
असंच करत करतच या देशाने गाठलीय साठी.
छापील भाषण मात्र जपून ठेव,
पुढच्या १५ ऑगस्ट्साठी..!0 comments:

Post a Comment