Breaking News
Loading...
Thursday, 5 August 2010आज माझ्या मनी का भाव् पून्हा दाटले..
पाहूनी तुझला..मज काय आज आठवले..
विसरूण गेले होते मी सारे का आज पून्हा ते आठवले.. 
 
त्या भेटी त्या सर्व गोष्टी..
ते हातात धरूनी फिरणे..ते एकमेका मागून धावणे..
वाळू मध्ये नाव लिहूणी..पाण्याला अडविणे
वाळूत घर बांधूनी स्वप्न् नवे रंगवणे...
विसरूण गेले होते मी सारे.. का आज पून्हा ते आठवले.. 

माझे ते रुसणे,माझे ते रागावणे..
तुझे मला ते समजावणे माझी समजूत काढणे..
तूझ्या हाताचा स्पर्श, तुझे ते सारे शब्द..
विसरूण गेले होते मी सारे का आज पून्हा ते आठवले.. 

मनाच्या एका कोपर्यात होत ते सार..
जबाबदारीच कूलूप लावून बधं केल होत सार..
पण आज तूला पहाताच .सगळ पुन्हा सम्रोर आल ..
जबाबदारीच कूलूप तोडून्..डोळ्यातून वाहू लागल...
आणि आज मला कळले
तुला नव्हे मी, माझे मलाच कोंडले ..
विसरले नव्ह्ते मी काही..फक्त कुलूप आज तोड्ले..

0 comments:

Post a Comment