Breaking News
Loading...
Monday, 2 August 2010

१) फूलपाखरू तू,
तुला मुक्त करायचय,
स्वच्छंदी आयुष्य तुझ,
तुला परत द्यायचय !
२) माझ्यावरचा तुझा अधिकार,
आता मलाही नकोय,
श्वासा वरचा हा भार,
आता मलाही नकोय !

३) पुन्हा पुन्हा सांगाव तुला,
तू आता माझ्या मनात नाहीस,
आता मी तुला,
कशातच शोधत नाही !

४) जाता जाता तू,
एक काम करून गेलास,
कवितेच दान माझ्या,
ओंजळीत टाकुन गेलास !

५) 
नात तुटताना,
यातना होतातच,
काही जण त्या यातानानाच,
आयुष्याचा आधार बनवतात.
 
६) तुझ्या आठवणी,
सदैव सोबत राहतील,
आयुष्य जगायला,
बळ देत राहतील !

७) तुझ प्रत्येक म्हणन ऐकल,
तुझ्यासाठी जगणच टाळल,
अगदी तुला विसरायचेही
तुला दिलेल प्रत्येक वचन पाळल !
 

0 comments:

Post a Comment