Breaking News
Loading...
Tuesday, 3 August 2010

हवाई छत्री (पॅराशूट) कशी उडवायची याचे शिक्षण एका संस्थेत दिले जात होते.
एका भित्र्या उमेदवाराने (प्रशिक्षणार्थ्यांने) विचारले, ''जर हवाई छत्री उघडली गेली नाही तर?''
''काळजी करू नकोस,'' प्रशिक्षण प्रमुख,
''तू माझ्याकडे ये. मी तुला दुसरी नवीन हवाई छत्री देईन.''एक नवोदित लेखक तावातावाने संपादकांना- "माझे विनोद तुम्ही त्वरित का छापत नाही.
मी ४ महिन्यांपूर्वी पाठविलेला विनोद आता प्रसिद्ध केला."
संपादक महाशय -"अहो एवढे चिडता काय, आम्हाला जेव्हा विनोद समजतो तेव्हा आम्ही छापतो की."


प्रमिला- "काय गं, डोळा कसा काय सुजलाय तुझा?"
मीना- "काल रात्री नवऱ्यानं मारलं."
प्रमिला- "पण तुझा नवरा तर कोल्हापूरला गेला होताना काल."
मीना- "मला पण तसंच वाटलं होतं."


एक सरकारी कर्मचारी होता. त्याचे नशीब उघडले. त्याच्या हाती एक जुना दिवा लागला. तो घासताच त्यामधून जिन्न निघाला गडगडाट करत तो म्हणाला, ‘‘कुठल्याही तीन गोष्टी मागा.’’
‘‘मला थंडगार बिअर हवी,’’ कर्मचारी म्हणाला.
‘‘ढुक’’ जिन्नने हात फिरवताच बिअर आली.
‘‘आता असे बेट हवे ज्यावर माझा बंगला, मी अन् सुंदर तरुणींचा ताफा हवा.’’
‘‘ढुक!’’ अन् सारे तयार.
‘‘आता मला काहीच काम करावे लागायला नको.’’
‘‘ढुक!’’ अन् तो सरकारी कर्मचारी परत त्याच्याच कार्यालयात होता.


सासू-सुनेचा जोरदार वाद चालला होता. कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता. सासरेबुवा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते. वैतागलेल्या मधूने पत्नीला बाजूला घेऊन सांगितले. ‘हे बघ, उगाच वाद वाढवू नकोस, आई अजून फार तर एक-दोन वर्षांत आटपेल, कशाला वाईटपणा घेतेस.’ थोडय़ा वेळाने मधूने आईला सांगितले, ‘आई, तुझे आता वय झाले आहे. विनाकारण वाद घातला नाहीस तर आणखी पंधरा-वीस वर्षे आरामात जगशील’ सासू-सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत.

एक छोटा डास त्याच्या आईला विचारतो, ‘‘मी गाण्याच्या कार्यक्रमाला जाऊ का?’’
आई : ‘‘कोणता कार्यक्रम आहे?’’
छोटा डास : ‘‘पल्लवी जोशींचा ‘सारेगमप’ कार्यक्रम.’’
आई डास : ‘‘जा; पण सांभाळून राहा. कारण तिथे लोक सारखे टाळ्या वाजवित असतात.’’

न्यायाधीश- ‘‘तू चोरी करत होतास तेव्हा त्या घराचा मालक तुझ्यापासून किती अंतरावर होता?’’
चोर- ‘‘मी चोरी करायला गेलो होतो. जमीन मोजायला नाही.’’


एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला. समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ‘‘एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.’’ त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ‘‘पण मला मिशा नाहीयेत.’’ त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, ‘‘पण माझ्या बायकोला आहेत ना.’’


गब्बर- "ये हाथ मुझे दे दे ठाकूर.."
ठाकूर- "गप रे येडय़ा, आपण काय पाच तीन दोन खेळतोय?"

एक गवंडी जखम झाली म्हणून डॉक्टरकडे गेला. तेथील कंपाऊंडरने सहज विचारले, ‘अहो, इतकी मोठी जखम कशी झाली?’ गवंडी म्हणाला, ‘मी तिसऱ्या मजल्यावर शिडी लावून भिंत सारवासारव करीत होतो. समोर आत पाहिले तर एक सुंदर तरुणी आंघोळ करीत होती. अचानक शिडी पडली आणि मला जखम झाली.’ तो रसिक कंपाऊंडर मनातल्या मनात मांडे खात म्हणाला, ‘अरेरे! त्याच वेळी शिडीला पडायचे होते काय?’ तो गवंडी म्हणाला, ‘अहो, पन्नास माणसे त्या शिडीवर यायला लागली तर ती पडेल नाही तर काय?’

बबन्या जिलेबीवाल्याला- ‘तू ही जिलेबी किती वर्षांपासून बनवतो आहेस?’
जिलेबीवाला- २० वर्षांपासून.
बबन्या- तुला लाज वाटत नाही. इतकी वर्षे जिलेबी बनवतोस पण तुला अजूनही ती सरळ बनवता येत नाही.
‘‘एवढा कसा रे बावळट! बायकोचे लाड करताना खिडकीचा पडदा तरी ओढून घ्यायला नको का?’’ तेव्हा तो विचारतो, ‘‘तुला कसे कळले?’’ तो म्हणतो, ‘‘काल रात्री मी पाहिलं.’’ तेव्हा त्याचा दोस्त म्हणतो, ‘‘मी नाही, तूच बावळट आहेस. कारण काल रात्री मी घरीच नव्हतो.’’

.

0 comments:

Post a Comment