Breaking News
Loading...
Monday, 11 October 2010

तेव्हा.........तू गेलिस तेव्हा!!

आयुष्यात कुठेतरी काहीतरी
चुकल्यासारखं वाटतं
.............. तू गेलिस तेव्हा!

सगळ्या आशा, सगळी स्वप्न
तूटल्यासारख वाटतं
 ............. तू गेलिस तेव्हा!

आयुष्यभर एकटाच होतो,
आत्तही एकटाच राहिलो
................... तू गेलिस तेव्हा!

तुझ्या आठवणीत आयुष्य पुढे सरकत होतं,
त्याही अपुर्‍या राहिल्या
..........तू गेलिस तेव्हा!

तुझ्या अपेक्षाचं ओझं वाहताना आयुष्य निसटून गेलं,
पण माझ्या अपेक्षा अपुर्‍या अजूनही
.. ...................................तू गेलिस तेव्हा!

माझ्या दुखांवर फुंकर घालायलाही कोणी नाही,
या जखमा तेव्हाच भरतील...........
" तू परत येशील तेव्हा"!!!!

साभार-कवी :............प्रथमेश राउत.............

0 comments:

Post a Comment