पहीलाच पाउस कोसळत होता,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
त्यात प्रथमच ओलचिम्ब झालो होतो,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
त्यानंतर प्रेमाचा बहर बरसला होता,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
अगणित शपथा घेऊन जगत होतो,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
सर्व स्वप्न साकार होतील अस वाटत होत,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
प्रत्येक संकटात एकमेकाना साथ दयायच ठरल,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
सर्व सुख-दुख़ वाटुन घ्यायच ठरवल ,
तेव्हा फ़क़्त होतो मी आणि तू!
आयुष्यात मरणाच्या वाटेवर उभा असेन,
तेव्हा फ़क़्त असेन मी,
आणि नसशील ती फक्त तू.....................
साभार - कवी :प्रथमेश राउत....................
0 comments:
Post a Comment