Breaking News
Loading...
Wednesday, 20 October 2010अजून ही मला खर वाटत नाही
ती नाहीये हे मनास पटत नाही

आता काल-परवा पर्यंत ती होती
माझ्या अवती-भवती दरवळत
एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे
मनात भिनलेली कळत-नकळत
 
ती होतीच तितकी सुंदर
कानात अजूनही आहेत तिचे बोल
तिची साथ म्हणजे जणू इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा होता अनमोल

तिच हसण तिच असण
हे किती सुखद असायच
गोजिर्‍या गाली तिच्या
फूल पाखरू हसायच

तिचे श्वास हेच माझे आयुष्य
तिच्याविना मी कुठे जगत होतो
सुखाच्या सागरी निजाव तिने
हेच देवाकडे मागण मागत होतो

पण ती खरच एक कळी होती
कळीच आयुष्य ते केवढ
मूठभर पाणी हाती घेऊन
ती उघडल्यावर राहील तेवढ

चिमुकल्या हातांनी जन्म भराच्या
आठवणी देऊन गेली आहे
प्राण माझे ही घेऊन गेली
शरीर फक्त ठेऊन गेली आहे.........

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment