Breaking News
Loading...
Monday, 27 December 2010


आलीस माझ्या आयुश्यात सोनेरी पहाट बनुन,
देशील मला आयुष्यभराची साथ् माझी प्रेयसी बनुन............

मन माझे उदास होते जणु कोमेजलेले फुल,
आता तुझ्याच सोबत मांडायचि आहे मला जन्मो-जन्मीची चुल.........

कशी अवतरलिस तु या भुतालावर काय सांगु,
सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आता देवाकडे काय मागु...........

असायचो एकटाच मी विरहाच्या क्षणात बुडालेला,
कस समजवु तुला प्रेमावरचा विश्वासच माझा उडालेला.......

तुझ्या येण्याने परत मनात अंकुर फुलवला आहे,
माझ्या अंगणात मी परत स्वप्नांचा झूल़ा झुलवला आहे.........

ह्या झुल्यावर आयुष्यभर तुझ्यासंगे मला झुलू दे.....
आणि तुझ्या मिठीतच नेहमी हि सोनेरी पहाट मावळू दे.

साभार कवी : प्रथमेश राउत..


0 comments:

Post a Comment