Breaking News
Loading...
Tuesday, 11 January 2011

एकमेकांचा निरोप घेतांना
खुप् दुःखी होतो आपण
लवकरच परत भेटायच
असही ठरवल होत आपण

अश्रूंना मोकळी वाट करुन
खुप रडलो होतो आपण
रडायच नाही असे ठरवत
उगाचच खोट खोट हसलो होतो

नात टिकवायच ठरवलय आपण
आयुष्याच्या शेवटपय॔त
माझीच राहशील का सखी
अखेरच्या श्वासापय॔त?

सोबत आहे आपल्याला
विश्वासाची अन् प्रेमाची
पण मध्येच येते भिंत
घरचांच्या प्रतिष्ठेची

कदाचीत तुला घरच्यांसाठी
दुसरयाशी लग्न करावे लागेल
तुझ सव॔स्व असणारया मला
त्याच्यांसाठी दुःखवाव लागेल

दुःखवू शकत नाही मी सुद्धा तुला
म्हणून मरणाचा विचार करेल
पण् तुझा विचार करता क्षणी
आपोआप पाउल अडेल

तुला तिलेल्या वचनांसाठी
त्याच्या सोबत जगेन
जगेन कस?
जगण्यापेक्षा रोज तिळ तिळ मरेन

तुझावर प्रेम असुनसुध्दा
तुझा विरह सोसेल
आठवणीवर जगताना
रडतांनाही हसेल

तरीही असेल ओढ मनात
तुझ्या मिलनाची
वाट पाहत असतील डोळे
तुझ्या एका झलकची

काय म्हणाव याला
माझ्या प्रेमाची हार की जित
सांग सखी खरच सांग
कशी फुलेल आपली प्रित?

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment