Breaking News
Loading...
Thursday, 10 March 2011

"नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
..........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !!"

"नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
...........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद !"

"अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा !"

"कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद !"

"आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद!"

"एका वर्षात महिने असतात बारा,
......... या नावात सामावलाय आनंद सारा!"

"दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी!"

"आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"


साभार - वर्षा इंगळे

0 comments:

Post a Comment