Breaking News
Loading...
Tuesday, 18 October 2011
प्रिय मित्रानो

          १५ ऑगस्ट २०११ रोजी मन माझे तर्फे "तळोजा येथील परम शांतीधाम वृद्धाश्रम" येथे  मदत योजना राबवण्यात आली आणि तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.

         यंदा बालदिनानिमित्त सुद्धा मन माझे तर्फे आम्ही अनाथ मुलींसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. "टिटवाळा येथील मुक्त बालिका भवन"  या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान मुलीना मन माझे तर्फे आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे. आपण दिनांक १३ नोव्हेंबर २०११ रोजी या अनाथ आश्रमास भेट देऊन त्या सर्वांना भेटवस्तू देणार आहोत. ज्या कोणी सभासदांना आमच्यासोबत अनाथ आश्रमास भेट देण्यास यायचे असेल ते जरूर येऊ शकतात.

         असं म्हणतात की मुलगी ही दोन घरांना सुखी करते, एक म्हणजे माहेर आणि दुसरं म्हणजे सासर. पण सध्याच्या युगात मुलींचं जगणं खूप मुश्कील होऊन बसलं आहे. काही जणींना आयुष्यातील नाजूक क्षण व्यथित करण्यासाठी अनाथ आश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे. अनाथ मुलांचे चांगले पालनपोषण करून चांगले संस्कार करणे आणि नवे आव्हान स्वीकारण्यास त्यांना प्रवृत्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे आम्हास वाटते. तरुणाई ह्या कामी विशेष प्रयत्न करु शकते व करत आहे. म्हणून आम्ही सुद्धा आमच्याकडून एक छोटंसं पाउल उचललेल आहे. त्याला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !!

        अंदाजे ४० मुली या अनाथ आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी येणारा अपेक्षित खर्च पुढील प्रमाणे आहे:

अन्नपुरवठा : ५००० रुपये
देणगी : सर्वांचे एका वेळेचे जेवण : १००० रुपये.
           एका मुलीचा शैक्षणिक खर्च: २००० रुपये
           एका मुलीचा वर्षाचा संपूर्ण खर्च ( दत्तक घेणे ): ७००० रुपये
औषधोपचाराचे  सामान : १००० रुपये
भेटवस्तू ( साबण, तेल, पावडर, रुमाल  इत्यादी ) : ३००० रुपये

       
            तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

सचिन हळदणकर : ९८६९२५७८०८
प्रथमेश राउत : ९७७३६८७७६२


        आम्ही सर्व दिवाळी निमित्ताने रविवार ३०  ऑक्टोबर रोजी भेटणार आहोत तर तेव्हा आपण स्वहस्ते रविवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.३० वाजता सायन किल्ला, सायन( शीव), पूर्व. इथे येवून देणगी देवू शकता आणि आमच्या सोबत दिवाळी हि साजरी करू शकता !!

         ज्या हितचिंतकांना शक्य नाही ते इंटरनेटद्वारे सुद्धा खालील अकाउंट वर देणगी पाठवू शकता.आपली विश्वासाने केलेली छोट्यात छोटी मदत सुद्धा समाज कार्यासाठी वापरली जाईल याची मन माझे तर्फे आपल्याला खात्री देण्यात येत आहे !!
 
Name: Sachin Haldankar
Account No. 005701556713
IFSC Code - ICIC0000057
MICR Code - 400229013
Bank - ICICI Bank Ltd.
Branch Name - MUMBAI - PRABHADEVI

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
आभार
टिम मन माझे.....0 comments:

Post a Comment