Breaking News
Loading...
Thursday, 3 November 2011

            मन माझे ग्रुपतर्फे आपण वेळोवेळी सामाजिक उपक्रम करतच आहोत, आणि सर्व उपक्रमांना तुम्हा सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लाभला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्व सभासदांचे मनापासून आभार. मन माझे तर्फे सहलींचा उपक्रम आम्ही राबवला त्याही उपक्रमाला सर्वांनी उपस्थिती दाखवली. अशीच धम्माल मस्ती पुन्हा एकदा करण्यासाठी आम्ही आपणा सर्वाना आमंत्रित करत आहोत.


           
दिनांक  १९  आणि २० नोव्हेंबर रोजी मन माझे ग्रुपतर्फे "शिर्डी- दर्शन सहल" आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे. सहलीसाठी प्रत्येकी रु. १०००/- शुल्क (प्रवास खर्च + नाश्ता + जेवण) आकारण्यात आले आहे. या पूर्ण सहलीत आपल्याला, शिर्डी,शनीशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर,सप्तशृंगी देवी ही ठिकाणे पाहण्यास मिळतील. 

नियम व अटी :-
१.  प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
२. सहल शुल्क १३ नोव्हेंबरच्या आधीच जमा करावे.
३. भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
४. सहलीमध्ये ज्या ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत, त्यापैकी कोणतेही ठिकाण वाढले किंवा रद्द  झाल्यास त्याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार, टीम मन माझे कडे राहतील.

         तरी जे कोणी सभासद सहलीस येण्यास इच्छुक असतील त्यांनी १२ नोव्हेंबर पर्यंत फोन करून लवकरात लवकर शुल्क जमा करावे.


संपर्क:
सचिन हळदणकर :- ९८६९२५७८०८.
प्रथमेश राऊत :-  ९७७३६८७७६२.


आभार
टिम मन माझे.....


0 comments:

Post a Comment