Breaking News
Loading...
Monday, 2 January 2012

*जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. *
*- नारायण मूर्ती *

*यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच
यशाच्या जवळ जाणे होय.*
*- विश्‍वनाथन आनंद*
*
**नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *
*- धीरूभाई अंबानी *

*पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *
*- जे. आर. डी. टाटा *

*फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *
*- रघू राय *

*चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*
*- बिल गेट्‌स *

*मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण
तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
*- कल्पना चावला *

*कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*
*- बराक ओबामा *

*माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे
असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा
जरा जास्त होती इतकेच. *
*- आयझॅक न्यूटन *

*मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार
आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.*
-* सर्वपल्ली राधाकृष्णन*

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment