Breaking News
Loading...
Friday, 15 June 2012

मन माझे तर्फे माई सिंधुताई सपकाळ संचालित संमती बालनिकेतन मदत योजना !!!

प्रिय मित्रानो

१५ ऑगस्ट २०११ रोजी मन माझे तर्फे "तळोजा येथील परम शांतीधाम वृद्धाश्रम" येथे , १३ नोव्हेंबर २०११ रोजी टिटवाळा येथील मुक्त बालिका भवन येथे  मदत योजना राबवण्यात आली..तसेच ९ जानेवारी २०१२ रोजी खार येथील सिनियर सिटीझन स्पेशल केयर युनिट येथे क्रीडा दिन साजरा करण्यात आला आणि तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.
यंदा सुद्धा मन माझे तर्फे आम्ही माई सिंधुताई सपकाळ संचालित संमती बालनिकेतन मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. पुणे येथील आदरणीय माई सिंधुताई सपकाळ संचालित "संमती बालनिकेतन" या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान चिमुकल्यांना मन माझे तर्फे आम्ही देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे. आपण दिनांक २४ जून २०१२ रोजी या बालनिकेतनास भेट देऊन त्या सर्वांना देणगी आणि भेटवस्तू देणार आहोत. ज्या कोणी सभासदांना आमच्यासोबत बालनिकेतनास देणगी आणि भेट द्यावयाची असेल त्यांनी संपर्क साधावा.

  आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. 'माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत', हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.

माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. मित्र-मैत्रिणीनो माईच्या या कार्याला आपण सुद्धा नक्कीच मदत करायला हवी. म्हणून आम्ही सुद्धा आमच्याकडून एक छोटंसं पाउल उचललेल आहे. त्याला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !! आतापर्यंत आम्ही १९०६७ रुपयांची देणगी जमा केली आहे पण आणखीन मदत आपल्या कडून सुद्धा अपेक्षित आहे. आपणास जमेल तो खारीचा वाट उचलून मदत कराल ती मोलाचीच ठरेल. 
तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

सचिन हळदणकर : ९८६९२५७८०८ ( Central Line )
प्रथमेश राउत : ९७७३६८७७६२ ( Western Line )
धनाजी सुतार :  ९९३००९२३०७ ( Harbor Line )
देवेन सकपाळ : ९६१९६८६०६१ ( Western Line )
रोहित वेलवंडे : ९८७०५८५८३१ ( Central Line )

ज्या हितचिंतकांना भेटून शक्य नाही ते इंटरनेटद्वारे सुद्धा खालील अकाउंट वर देणगी पाठवू शकता.आपली विश्वासाने केलेली छोट्यात छोटी मदत सुद्धा समाज कार्यासाठी वापरली जाईल याची मन माझे तर्फे आपल्याला खात्री देण्यात येत आहे !!

Name: Sachin Haldankar
Account No. 005701556713
IFSC Code - ICIC0000057
MICR Code - 400229013
Bank - ICICI Bank Ltd.
Branch Name - MUMBAI - PRABHADEVI


आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
आभार
टिम मन माझे.....

मन माझे सेवाभावी संस्था : http://mannmajhetrust.blogspot.in/

0 comments:

Post a Comment