Breaking News
Loading...
Friday, 24 August 2012आता मला तिला पाहायचे आहे
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?......

सतत मी तिचा विचार करत असतो
क्षणाक्षणाला मी तिच्या प्रेमात पडत असतो
बोलायला जावेतर ती हसत विषय बद्लत असते
माझ्या काळजाचे ठोके वाढवत  असते

म्हणूनच मला तिला विचारायचय
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?....
प्रेम करणे कधी वेडेपण असते
प्रेमात पडणारे सुद्धा वेडेच असतात का ?
मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे
ती सुद्धा माझ्या प्रेमात पडेल का ?... 

म्हणूनच मला तिला विचारायचे आहे ....
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?....

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment